Thursday, 14 May 2026

सआदत हसन मंटो वर माझ्या मुलाचा लेख

 "सआदत हसन मनटो" याविषयी माझा लेख

       अभिषेक विलास काळे.

        दि.18-01-2026

        पुण्यतिथी निमित्त लेख लिहिला होता.



सआदत हसन मनटो त्यांच्याबद्दल बोलताना अनेकदा सज्जन समाज नाक मुरडतो. ते तर दारुडे होते त्याची संगत चांगली नव्हती.ते नको त्या विषयावर लिहायचे असे आरोप त्यांच्यावर आजही होतात. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्या समाजाने मंटो यांना बदनाम केले तो समाज स्वतः किती स्वच्छ होता?

मंटो यांच्या व्यसनापेक्षा त्यांच्या विचारांची धार जास्त होती, जी आजही पचवणे कठीण आहे.

मनटो हे दारू प्यायचे हे सत्य आहे. पण त्या दारूच्या नशेत ही त्यांना समाजातल्या त्या विदारक जखमा दिसत होत्या ज्या सामान्य डोळ्यांना दिसत नव्हत्या.

विचार करा एक समाज असा की तो आतून सडलेला आणि मनटो आहेत जे व्यसनाच्या गर्देत असूनही माणुसकीच्या कथा लिहित होते. मनटो यांची दारू हा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचा भाग होता. पण त्यांच्या लेखणीने समाजाच्या जखमावर जे औषध लावले त्याचा हिशोब कोण देणार?

मनटोंच्या मते दारू पिऊन सत्य बोलणारा माणूस हा त्या लोकांपेक्षा श्रेष्ठ आहे जे शुद्धीवर असूनही खोटेपणाचे आणि देशाचे राजकारण करतात. आजही आपण त्या माणसाच्या विचारांपेक्षा त्यांच्या व्यक्तिगत दोषावर जास्त चर्चा करतो. माझ्या मते मनटोंच्या हातातील दारूची बॉटल पाहण्यापेक्षा त्यांच्या हातातील लेखणीने दिलेले धक्के आपण अनुभवले पाहिजे.

मनटो वाईट होते की चांगले होते,हा मुद्दाच नाही.... महत्त्वाचे हे आहे की त्यांनी जे लिहिले ते सत्य होते की नाही.

जर त्यांचे साहित्य आजही आपल्याला अस्वस्थ करत असेल तर याचा अर्थ मनटो हे जिंकले आहेत आणि आपला दिखावा हरला आहे. दारूच्या नशेतला तो माणूस समाजाच्या डोळ्यातील धुंदी उतरवण्यासाठी पुरेसा ठरला आहे.

मनटो यांनी आपल्या कथांमधून वेश्या ,मजूर, रस्त्यावरील माणसांना स्थान दिले..... ज्यांना आपण नीच मानून दुर्लक्षित करतो. त्यांच्यातील माणुसकी मनटो यांनी जगाला दाखवली आहे. माणूस हा जन्माने नाही तर त्याच्या कर्माने आणि परिस्थितीतून घडतो हा विचार त्यांनी मांडला आहे.

त्यांनी समाजाला प्रश्न विचारला की जर तुम्ही या माणसांना माणूस म्हणायला तयार नसाल तर तुम्हाला स्वतःला सभ्य म्हणून घेण्याचा काय अधिकार आहे. याप्रमाणे अनेक विद्रोही व सर्वांना टोचणारे प्रश्न त्यांनी विचारले. सध्याच्या मीडियावर देखील मनटो यांचे  विचार काट्यासारखे टोचणारे आहेत ते म्हणतात की जर पत्रकार आपले कलम विकायला लागला तर तो कोठ्यावरील बसणाऱ्या वेश्या पेक्षाही जास्त गेलेला व घातक आहे.कारण वेश्या फक्त स्वतःचे शरीर विकते. पण पत्रकार संपूर्ण देशाचे भविष्य आणि समाजाचा  समाजाचा विश्वास विकतो.

माणूस मेल्यावर काय होतो हे मला माहीत नाही पण जिवंतपणे तो हिंदू किंवा मुसलमान होण्याआधी माणूस असायला हवा याप्रमाणे कठोर आणि सत्य विचार त्यांनी समाजाला सांगितले. त्यामुळे आजही मनटो हे खोटारड्यांना व भ्रष्टाचारांना टोचतो.

Monday, 23 March 2020

कोरोना संदर्भातील नोंदी.

दि.15 मार्च पासून शाळा बंद चा आदेश आला व सकाळी आम्ही शाळेत जात होतो. शाळेत जाऊन शाळाबंद चे आदेश तामील करायचे होते.त्याप्रमाणे शाळेत गेलोत.सर्वकाही प्रशासकीय बाबी पूर्ण करून घरी आलोत.खूप दिवसांनी म्हणजे तरी एक महिन्यापासून ऐकून होतो की कोरोना हा जीवाणू अनेक देशात थैमान घालत आहे.भारतात मात्र अजून सुरुवात झालेले नव्हती. पण अचानक 9 मार्च पासून कोरोनाचे आजारी व्यक्ती देशात ही सापडू लागले व सर्वत्र हाहाकार सुरू झाला.प्रथम सर्व शासकीय कार्यालयाना सुट्टी जाहीर केली व तसे आदेश ही पारित केले.आम्ही शाळेतील सर्वच शिक्षक घाबरून गेलो होतो.सतर्क होऊ लागलो होतो.मास्क लावणे सुरू केले होते.आम्ही तर सरकारी दवाखान्यात गेलो व सर्व precautions विचारून आलो.तसेच काही मास्क,sanitizer घेऊन सुध्दा आलोत.सुट्टीत काय काय करायचे ? हे आम्ही ठरवू लागलो होतो. खूप वाचन करणे,लेखन करणे,ध्यान धारणा करणे.असे अनेक आखाडे मनात ठरवू लागलो होतो.त्याप्रमाणे आम्ही कार्य सुरू ही केले होते.एक दिवस जात होता व रोज नवनवीन आदेश शासन,प्रशासन काढत होते.19 मार्च ला दोन कार्यक्रम होते.हे दोन्ही कार्यक्रम रद्द झाले होते.जिल्हाधिकारी श्री रेखावार साहेब यांनी सर्व गर्दीचे समूहाचे उपक्रम व कार्यक्रम परवाने रद्द केले होते.एक कार्यक्रम-19 मार्च प्रथम शेतकरी कुटुंबाची आत्महत्या म्हणून अन्नत्याग आंदोलन कार्यक्रम व स्टाफचे सहकारी श्री तोडकर सर यांचा वास्तू शांती व वास्तू पूजन कार्यक्रम .हे दोन्ही कार्यक्रम 15 मार्चला रद्द झाली. त्यानुसार 19 मार्चला फक्त आम्ही अन्नत्याग उपवास दिवसभर वैयक्तिक स्तरावर ठेवू शकलोत. शेतकरी विरोधी भावना व्यक्त करण्यासाठी उपवास एक दिवस रोज्यासारखा केला.वेगळाच अनुभव आला.अनेक अनुभव आले.एक अनुभव असा की नाक खूप तीव्र झाले दिवसभर.अनेक वास खूपच सुंगधीत येऊ लागले.एरव्ही येत नव्हते.पण उपवास दिशी अनेक ठिकाणचे वास आम्हाला परेशान करीत होते.तरीपण आम्ही दुर्लक्ष करीत सकाळी 5 ते संध्याकाळी 5 पर्यंत फक्त पाणी घेऊन उपवास केला.कृतज्ञता व्यक्त करताना शेतकऱ्यांनाबद्दल खूप जाणीव निर्मिती झाली.खूप स्मरण केले.चिंतन केले.आजच्या यावेळेपर्यंत इतकेच .उर्वरित नंतर लिहितोत.

Friday, 13 March 2020

Nanded photos of program


First time writing on my blogger.

आज खूप वर्षांनी ब्लॉग वर आलो.माझे ब्लॉग अकाउंट 2015 मध्ये काढलेले आहे.आणि त्यांनंतर मी बिलकुल वापरले नाही. परंतु आज वापरण्याची गरज वाटत आहे.म्हणून आजपासून blogger म्हणून माझे लेखन या ब्लॉग वर देणार आहे.आशा आहे की हा लेखनप्रवास निश्चित सुखकर व मार्गदर्शक होईल.या ब्लॉग वर सर्व विषय मी लेखनासाठी घेणार आहे.शैक्षणिक, सामाजिक,राजकीय,पर्यावरण, अध्यात्मिक,खेळ,साहित्य,ध्यान,आरोग्य ई. विविध विषयांवर मी माझे विचार मांडणार आहे.शाळेविषयी, घरांविषयी,गावांविषयी,परिसरांविषयी,समाजाविषयी माझे मते,माझे विचार,माझे चिंतन या ब्लॉग वर मांडणार आहे.